![]() |
उद्घाटन प्रसंगी डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, डॉ.सरगर, वसंत कांबळे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष व ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभागातर्फे मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात ९० जीवनदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी सेवेचा आदर्श घालून दिला. यावेळी हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, जयसिंगपूर कॉलेजच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक व रचनात्मक उपक्रम राबवले जात असतात. या असंख्य उपक्रमा पैकी रक्तदान शिबिराचे आयोजन म्हणजे विकासात्मक व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम होय.ते पुढे म्हणाले, रक्तदान शिबिर म्हणजे युवकांना राष्ट्रीय कार्य करण्यासाठी एक रचनात्मक ऊर्जावान उपक्रम होय. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले,हे शिबिर मानवतावादी व समाजभिमुख विचार च्या प्रेरणेने आयोजित असल्याने विद्यार्थी सुद्धा सामाजिक संवेदनशील तेच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतो.
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. आभार एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट सुशांत पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या वेळी मानव्यविद्या शाखाप्रमुख, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, विज्ञानविद्या शाखाप्रमुख, प्रा.डॉ.स्मिता महाजन, वाणिज्यविद्या शाखाप्रमुख डॉ.एस. आर.नकाते, उपप्राचार्य डॉ. भारत आलदर, डॉ. महावीर बुरसे, मा. लोंढे, मा.गवळी, डॉ. सरगर, शुक्राचार्य ऊरणकर,प्रा. बी. ए.पाटील,कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
विशेष करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस वसंत कांबळे व त्यांचे मित्र यांनी रक्तदान करून शिबिराला प्रोत्साहित केले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले त्यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या शिबिराला कॉलेज विद्यार्थी सह नागरिकांनी ही रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा